पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेसाठी एस पी कॉलेजच्या मैदानावरच्या मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या गुरुवारी पुण्यात प्रचारसभा पार पडणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही झाडं तोडण्यात आली असून ती तोडण्याची परवानगी घेतली होती. असा दावा सभेच्या आयोजकांकडून करण्यात आलं आहे.
एसपी कॉलेजच्या मैदानात व्यासपीठ उभारण्याचं काम सुरु आहे. यावेळी अडथळा ठरणारी जवळपास १५ ते १६ झाडे कापण्यात आली आहेत. एकीकडे कोट्यवधी वृक्षांची लागवड केल्याचा दावा करणारे भाजप नेते झाडांबाबत किती संवेदनशील आहेत हेच यातून दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. त्यांची पहिली सभा परळीत होणार आहे.
त्यानंतर नरेंद्र मोदी साताऱ्यात जाणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास त्यांची सभा पार पडणार आहे. एसपी कॉलेजच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे. त्यानंतर मोदी दिल्ली रवाना होणार आहेत. व त्यानंतर शुक्रवारी मुंबई मध्ये प्रचाराची सांगता करणार आहेत.
Visit : bahujannama.com