पुणे : राज्यातील शिवनेरी आणि अश्वमेध एसटी तिकिटाच्या दरात ८० ते १२० रुपये कपात करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. पुणे- मुंबई शिवनेरीचे तिकिट आता ४४० रुपये होणार आहे. सोमवारपासून हे दर लागू होतील अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. गेल्या १५ वर्षांपासून शिवनेरी सेवा सुरूकरण्यात आली आहे. एसटीची ही सर्वाधिक लोकप्रिय सेवा मानली जाते. प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी तिकिटात आणखी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या वाहतूक विभागाने स्पर्धात्मक दर सादर करून कपातीचा प्रस्ताव सादर केला होता.
शिवनेरी व अश्वमेध या दोन्हींचा दर महा १ लाख ५० हजार प्रवासी लाभ घेतात. शिवनेरी आणि अश्वमेघचे सध्या ७ मार्ग कार्यन्वित आहेत. त्यांच्या दररोज ४३५ फेऱ्या होत आहेत. दिवाळी, उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांमध्ये गावाला जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते़ त्यामुळे खासगी प्रवासी कंपन्या आपल्या दरात भरमसाट वाढ करुन प्रवाशांची लुट करत आले होते. मात्र, शिवनेरी व अश्वमेघ यांचे दर त्यामानाने कमी असल्याने या उन्हाळ्याच्या सुट्टीत नागरिकांनी शिवनेरीने प्रवास करणे पसंत केले. त्याचा खासगी वाहतूक संस्थांना मोठा फटका बसला होता.
पुणे ते मुंबई दरम्यान शिवनेरीला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो आहे़ त्यामुळे पुणे मुंबई प्रवास आता १२० रुपयांनी स्वस्त होणार आहे.
शिवनेरीचे नवीन तिकिट दर
मार्ग सध्याचे दर नवीन दर
पुणे स्टेशन – दादर ५२० ४४०
स्वारगेट-दादर ५४० ४६०
स्वारगेट – ठाणे ५२० ४४०
स्वारगेट- बोरिवली ६१५ ५२५
पुणे- औरंगाबाद ७७५ ६५५