नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसने आता महामारीचे रूप धारण केले असून हा विषाणू भारतासह आणखी १०० देशात पसरला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे ६० प्रकरणे समोर आली असून जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी घोषित केला आहे. या प्रकरणात WHO चे म्हणणे आहे की, आतापर्यंत कोरोनामुळे ४३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून यामुळेच या आजाराला महामारी घोषित केले गेले आहे.
कोरोना व्हायरसला थांबवण्यासाठी आणि त्याचा उपचार करण्यासाठी अजूनतरी कोणतेही औषध आले नसून त्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी त्याचा पसार थांबवणे हाच एक उपाय आहे. अशात ट्विटरवर असा #canceleverything हॅशटॅग ट्रेंड होत आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी शक्य असेल तितक्या गरजेच्या गोष्टी टाळा. उदा, परदेश यात्रा, हॉस्पिटल व्हिजिट, मंदिर, पार्क, मेळावा इत्यादीमध्ये जाऊ नका. ज्येष्ठ आणि आजारी असणाऱ्यांकडे लक्ष द्या. हात मिळवणे टाळा, हाय किंवा नमस्कार करा. बाजारात जाणे गरजेचे असेल तर मास्क घालून जावा आणि अनावश्यक गोष्टींना स्पर्श करणे टाळा.
कोरोना व्हायरसला पसरण्यावर WHO ने जेवढे शक्य तेवढे लोकांपासून दूर राहा. आपल्या हातांना सॅनिटायझरने साफ करत राहा. जर कोणत्या व्यक्तीला सर्दी-खोकला असेल तर त्याच्यापासून कमीत कमी १ मीटरचे अंतर ठेवा, सल्ला दिला होता. तर दुसरीकडे ट्विटरवर असा Cancelled हॅशटॅग ट्रेंड होत असून लोक कुठेही जाणे टाळत आहेत. ते आपली ट्रिप वगैरे कॅन्सल करत आहेत. आतापर्यंत या हॅशटॅगसह हजारो ट्विट केले आहेत.
जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर बाहेर जात असाल तर या गोष्टी ध्यानात ठेवा.
जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी जाण्याचे टाळा.
जर खोकला किंवा सर्दी असेल तर वाटेत कुठेही थुंकू नका. इतर लोकांनाही यामुळे संसर्ग होऊ शकतो.
खोकला, ताप असलेल्या व्यक्तींपासून अंतर ठेवा.
शक्य तितके घरी राहा जर मार्केटला जायचे असेल तर मास्क घाला.
एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांना घरीच राहू द्या.
घरी येताच सॅनिटायझर किंवा साबणाने आपले हात पूर्णपणे धुवा.
आजारी प्राण्यांना आपल्याबरोबर प्रवासासाठी घेऊ नका.
प्रवासादरम्यान जर तुम्हाला काही आजार वाटत असेल तर ताबडतोब चालक दलाशी संपर्क साधा. जेणेकरून आपल्याला वेळेवर उपचार मिळू शकेल.
आपल्याला ताप-खोकला इत्यादी असल्यास प्रवास करणे टाळा.
मंदिर, कोणतेही पार्क किंवा चालणे टाळा. हे आपल्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते.
प्रवासादरम्यान मास्क लावा. तसेच सतत स्पर्श करू नका.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोविड-१९ चा व्हायरस लहान मुलांमध्ये नाही तर प्रौढांमध्ये जास्त वेगाने पसरत आहे. चीनच्या आकड्यांनुसार २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हा व्हायरस केवळ २.१ टक्के आहे.