पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Transport Commissioner Avinash Dhakne | केंद्र सरकारने (Central Government) फेटल मोटार अॅक्टमध्ये (Fetal Motor Act) बदल केला असून संबंधित असलेल्या सर्व गुन्ह्यांतील दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) देखील याबाबत लवकर निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालकांना आता दुप्पट दंड भरावा (pay double penalty) लागणार आहे, असे राज्याचे परिवहन आयुक्त (Maharashtra Transport Commissioner) अविनाश ढाकणे (Transport Commissioner Avinash Dhakne) यांनी सांगितले. पुण्यातील रस्ता सुरक्षा कार्यक्रमात अविनाश ढाकणे (Transport Commissioner Avinash Dhakne) बोलत होते.
पुण्यातील बालगंधर्व (Balgandharva) येथे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त (Road Safety Week) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आयुक्त अविनाश ढाकणे पुण्यात आले होते. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे (RTO Dr. Ajit Shinde),
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे (Sanjay Sasane), उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे (Atul Aade), चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले (Meghraj Raje Bhosale) व ज्येष्ठ कलाकार उपस्थित होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी बोलताना अविनाश ढाकणे म्हणाले, राज्यात अपघातात दीड लाखांपेक्षा अधिक लोकांचे मृत्यू होतात. यामध्ये सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे होतात. हेच रोखण्यासाठी दंडाची रक्कम (दुप्पट) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार आहे. अपघातामध्ये राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक मृत्यू होत आहेत. नाशिक पेक्षा पुण्यात (Pune) अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असले तरी किरकोळ आणि गंभीर अपघातांची संख्या जास्त आहे.
यामध्ये वाहनचालकांना आपला हात-पाय व इतर अवयव गमवावे लागले आहेत, असेही ढाकणे यांनी सांगितले.
Web Title :- Transport Commissioner Avinash Dhakne | drivers will have to pay double penalty if they break the rules Transport Commissioner Avinash Dhakne.
Omicron Variant | नवीन कोविड व्हेरिएंट Omicron चे पहिले छायाचित्र जारी Delta पेक्षा जास्त म्यूटेशन
Pune University | भारतातील पहिला सावित्रीबाई फुलेंचा पुर्णाकृती पुतळा पुणे विद्यापीठात उभारणार