मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाऊन हळूहळू उघडत आहे. आता तुम्ही तुमच्या वाहनांमधून कामानिमित्त बाहेर पडत आहात. अशावेळीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन चालकांसाठी एक सूचना केली आहे. तुमच्याकडे कार, स्कूटर, मोटरसायकल असेल तर सावधान रहावे लागणार आहे. तुम्हाला आता वाहतूक नियमांचे (Traffic Rules) पालन करावे लागणार आहे. जर तुम्ही चुकून नियम (Traffic Rules) तोडला किंवा वेगाने वाहन चालविले तर तुम्हाला सोडले जाणार नाही.
तुमच्यावर मोठ्या दंडाची पावती फाटू शकते. मंत्रालयाने वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या लोकांना इशारा देताना म्हटले आहे की, You only get ‘ONE LIFE’ in ‘REAL WORLD’ . वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नका, अपघाताची दाट शक्यता आहे. अनेकदा आपल्याला माहिती नसते की ऑनलाईन चलन Online currency फाडण्यात आले आहे. याची सूचना एसएमएसद्वारे दिली जाते. मात्र, अनेकदा तो नंबर बंद केलेला असतो, किंवा चुकीचा असतो. E-Challan चा स्टेटस कसा पाहाल? यासाठी आधी तुम्हाला echallan.parivahan.gov.in वर जावे लागणार आहे. यानंतर वेबसाईटवर चेक चलन स्टेटस वर क्लिक करावे लागेल.
येथे तुम्हाला चलन नंबर, वाहन नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन नंबरचे पर्याय दिसणार आहेत. यापैकी तुम्हाला वाहन नंबरच्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. येथे वाहनाचा नंबर टाकावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर गेट डिटेल्सवर क्लिक केल्यावर जर तुमच्या वाहनाला दंड आकारला गेला असेल तर त्याची पावती दिसणार आहे. हे चलन भरण्यासाठी तुम्हाला ‘Pay Now’ असे दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही ओटीपी OTP मागवून युपीआय, एटीएम किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरू शकणार आहात.
कृपया हे देखील वाचा:
काय सांगता ! होय, ‘कोविशील्ड’ची दुसरी लस घेतल्यानंतर ज्येष्ठाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू
महावितरणचे उद्यापासून पुन्हा थकीत वीज बिलांच्या वसुलीचे आदेश
Desirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची भूमिका