बहुजननामा ऑनलाईन – एक सप्टेंबरपासून नवा मोटार वाहन कायद्याबाबत नवे नियम लागू झाल्याने वाहनधारकांनी नियमभंग केल्यास दंडाची मोठी रक्कमही भरावी लागत आहे. वाहन कायद्यातील नियमांमुळे वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर अनेक ठिकाणी मोठ्या रकमेचे दंड झाल्याचंही समोर आलं आहे. मात्र वाहतुक पोलीसांच्या ढिसाळ कारभाराचा फटका एका तरुणाला बसला आहे.
उत्तरप्रदेशातील वाहतुक पोलीसांनी मारुती बलेनो कारने मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्याबद्दल दंड आकारला. मात्र दंडाच्या पावतीवर त्यांनी गाडीचा नंबर टाकण्यात चूक झाली. त्यांनी मारुती बलेनोऐवजी मारुती अल्टोच्या मालकाला दंडाची पावती पाठविली. त्यानंतर मारुती आल्टोच्या मालकाने ट्विटरवरून ट्राफीक पोलीसांना त्यांची चूक नजरेस आणून दिली.
दिल्लीत राहणाऱ्या मारुती अल्टोच्या चालकाने ट्विटरवरुन “माझी गाडी नऊ वर्ष जुनी आहे. जर उत्तर प्रदेशचे पोलीस ही गाडी १४४ किलोमीटर प्रतितास वेगाने चालवून दाखवणार असतील तर मी २ हजार रुपयांची पावती फाडतो.” तरुणाने उत्तर प्रदेश पोलिसांना त्यानं सांगितलं की, मी मारुती आल्टो चालवतो. पोलिसांनी चुकीचा नंबर टाकला आहे. तर या ट्विटवर अनेकांनी मजेशीर रिप्लायही दिले आहेत. पोलिसांकडून नंबर टाकण्यात चूक झाली असावी, असे म्हटले आहे तर, यातील एका कार चालकानं म्हटलं आहे की, नंबर चुकीचा लिहीला आहे का हे मला जाणून घ्यायचं आहे. उत्तर प्रदेश आहे… इथं काहीही चालतं.