उरण : बहुजननामा ऑनलाइन – किल्ले रायगडावर दिवाळीनिमित्त पणत्या लावण्यासाठी जात असताना मुंबईतील एका पर्यटकाचा हृदयविकाराचा झटक्याने( tourist-dies-of-heart-attack-at-raigad) मृत्यू झाला.
रमेश गुरव (रा. विद्याविहार, मुंबई) असे या मृत्यू पावलेल्या पयर्टकाचे नाव आहे. मुंबईहून रमेश आणि त्यांचे मित्र असा आठ जणांचा गट किल्ले रायगडावर रायगडावर दिवाळीनिमित्त पणत्या लावण्यासाठी निघाला होता. याचदरम्यान, रायगडावर पायऱ्या चढत असताना, रमेश यांची यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल रण्यात आले. त्याठिकाणी त्यांचायवर प्राथमिक उपचार करून त्यांना महाड येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.