Tokyo Olympics | बजरंगाची ‘कमाल’ ! किर्गिस्तानच्या अरनाजरवर केली ‘मात’

टोकियो : वृत्तसंस्था – Tokyo Olympics | ज्याच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा ठेवली जात असा असा कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Poonia ) याने आज आपली चांगली सुरुवात केली आहे. बजरंग पुनिया याने 65 किलो गटात किर्गिस्तानच्या (Kyrgyzstan) अरनाजर अकमातालिव (Arnazar Akmataliv) याला हरवत उप उपांत्य फेरी प्रवेश केला आहे. (Tokyo Olympics |Wrestler Bajrang Punia wins against Kyrgyzstan’s E Akmataliev in Men’s 65kg Freestyle 1/8 final match, enters quarterfinals)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
#TokyoOlympics | Wrestler Bajrang Punia wins against Kyrgyzstan's E Akmataliev in Men's 65kg Freestyle 1/8 final match, enters quarterfinals pic.twitter.com/VGYxES1jA0
— ANI (@ANI) August 6, 2021
बजरंगने 3-1 अशी आघाडी घेऊन पहिली फेरी जिंकली होती. दुसर्या फेरीत बजरंगने अकामातालिव याची टांग पकडून फीतले डाव टाकला होता. परंतु, दुसरी टांग त्याच्या हातात न आल्याने त्याची खेळी चुकली. शेवटच्या 30 सेंकदापर्यंत बजरंग पुढे होता. परंतु, शेवटच्या क्षणी अकामातालिवने अचानक आक्रमक होऊन 1-1 अशी बरोबर साधली. शेवटी ३-३ अशी बरोबरीत ही लढत सुटली आणि तांत्रिक आधारावर बजरंग पुनिया याने विजय मिळविला. आता दुपारी त्यांची उपउपांत्य फेरीतील लढत इराणच्या (Iran) मोर्टेझा चेका घियासी (Morteza Cheka Ghiasi) याच्याबरोबर होणार आहे.
Web Title : Tokyo Olympics | Wrestler Bajrang Punia wins against Kyrgyzstan s E Akmataliev in Men’s 65kg Freestyle 1/8 final match enters quarterfinals
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
EPF |EPF अकाऊंटमध्ये झाली चूक, तर दुरूस्त करू शकता; जाणून घ्या सोपी पद्धत
Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात पिस्तुल नाचवत मयत गुंड ‘भावेश’च्या बिर्थडेचं ‘सेलिब्रेशन’
Comments are closed.