टोकियो :वृत्त संस्था – Tokyo Olympics |भारतीय पुरुष हॉकी संघा(Indian men’s hockey team)ने गत ऑलंपिक विजेत्या (Olympic Winners) अर्जेटिनावर ३-१ अशी मात करीत लागोपाठ दुसरा सामना जिंकला आहे. शेवटच्या तीन मिनिटांपर्यंत सामना १-१ असा बरोबरीत असताना भारतीय संघाने (Indian Team) तीन मिनिटात दोन गोल मारुन सामना आपल्या बाजूने फिरविला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या विजयासह भारतीय पुरुष हॉकी संघाने (Hockey Association) टोकियो ऑलंपिकमधील (Tokyo Olympics) उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळविला आहे.
या सामन्यात भारतीय संघ लयीत आढळून आला. खेळाच्या प्रारंभापासून भारताने वेगवान चाली रचत चांगली सुरुवात केली. भारताच्या बचावपटूंनी अर्जेटिना खेळाडूंना कोणतीही संधी दिली नाही.
https://twitter.com/
भारताकडून वरुण कुमारे ४३ व्या, विवेक सागर प्रसादने ५८ व्या आणि हरमनप्रीत सिंह ने ५९ व्या मिनिटांनी गोल केले. तर अर्जेटिनाने ४८ व्या मिनिटाने गोल करुन सामन्यात बरोबरी केली होती.
सामना ५८ व्या मिनिटांपर्यंत बरोबरीत होता.
त्यानंतर पुढच्या तीन मिनिटाच्या अंतराने भारताने लागोपाठ २ गोल करीत सामन्यावर वर्चस्व गाजविले.
अ गटात आता भारत ऑस्ट्रेलियानंतर दुसर्या स्थानी आहे.
त्यांचा अखेरचा सामना ३० जुलै रोजी यजमान जपानबरोबर होणार आहे.
भारताच्या हॉकीमधील एकूण ८ सुवर्ण पदकांपैकी शेवटचे सुवर्ण पदक १९८० मध्ये मास्को ऑलंपिकमध्ये आजच्या दिवशी (२९ जुलै) मिळविले होते.
Web Title :Tokyo Olympics | Kelly Max in the last three minutes, India’s 3-1 win over defending champions Argentina; Entered the semifinals.
Nashik Crime | नाशिकच्या ‘सोनाली मटण-भाकरी’ हॉटेलमध्ये 25 वर्षीय तरुणाचा खून