टोकियो :बहुजननामा ऑनलाईन – Tokyo Olympics | गेल्या चार दशकापासून हॉकीमध्ये (Hockey) असलेल्या दुष्काळ या ऑलंपिकमध्ये (Olympics) संपला आहे. भारताने जर्मनीवर ५-४ अशी मात करीत कांस्य पदकावर नाव कोरले आहे. यापूर्वी भारताने मास्को ऑलंपिकमध्ये (Moscow Olympics) १९८० मध्ये हॉकीमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.
समिरनजीत सिंह (Sameeranjit Singh) याने दोन गोल करुन उत्कृष्ट कामगिरी केली. भारताची सुरुवातीला खराब कामगिरी झाली. जर्मनीकडून (Germany) पहिला फिल्ड गोल करुन सुरुवातीलाच आघाडी घेऊन भारतावर दबाव निर्माण केला. पहिल्या र्क्वाटरमध्ये जर्मनी १-० ने आघाडीवर राहिली. दुसर्या र्क्वाटरमध्ये सिमरनजित ने कमाल करीत भारताचा पहिला गोल करुन बरोबरी साधली. त्यानंतर जर्मनीने एका पाठोपाठ दोन गोल करीत ३ -१ अशी आघाडी घेतली. हरमनप्रीतचा फटका जर्मनीच्या गोल किपरने अडविला तरी हार्दिक सिंहला (Hardik Singh) गोल करण्यापासून तो रोखू शकला नाही. त्यानंतर दोनच मिनिटांनी पेनल्टी कॉर्नरवर (Penalty Corner) हरमनप्रीत सिंहने गोल करुन भारताला बरोबरी करुन दिली.
https://twitter.com/ANI/
दुसरा हाफ सुरु झाल्यावर दोन्ही संघ गोल करण्याचा प्रयत्न करीत होते. रुपिंदर सिंह (Rupinder Singh) यांने पेनल्टी कॉर्नर घेऊन भारताचा चौथा गोल करुन भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने आणखी एक गोल करुन भारताला ५-३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने चौथा गोल करुन सामन्यात पुन्हा परतण्याचा जोरदार प्रयत्न केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले.
मात्र, कोणालाही शेवटच्या काही मिनिटांमध्ये यश आले नाही.
भारताने दुसर्या हाफमध्ये जी आक्रमकता दाखविली,
त्यामुळे त्यांनी जर्मनीवर दबाव निर्माण केला आणि सामना ५-४ असा जिंकला.
भारतीय हॉकी टीमच्या (Indian Hockey Team) या यशाने देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून देशवासियांनी हॉकी टीमचे अभिनंदन केले जात आहे.
web title: Tokyo Olympics | 4 decades of drought in hockey ends! India beat Germany 5-4 to clinch the bronze medal.
Cold-Flu | ताप-खोकल्यात तुमच्या आरोग्याचे शत्रू बनतात हे 10 हेल्दी फूड, रहा दूर
High Court | पीडितेच्या मांड्यामध्ये केलेले वाईट कृत्य सुद्धा ‘बलात्कार’ समान – हायकोर्ट