टोक्यो : वृत्तसंस्था – Tokyo Olympics 2020 | नेमबाजीसह (Shooting) अनेक खेळात भारतीय खेळाडु (Indian player) पिछाडीला पडत असताना भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु (Badminton player P.V Sindhu) हिने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महिला एकेरीमध्ये तिने आपला दुसरा विजय आज सकाळी मिळविला. तिने हाँगकाँगच्या (Hong Kong) नगन यी चेंगला (Nagan Yi Chen) २१-९ आणि २१ – १६ अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत करुन उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
#TokyoOlympics: Indian shuttler PV Sindhu (in file photo) beats Hong Kong's Ngan Yi Cheung 21-9, 21-16 in women singles group stage pic.twitter.com/PJi2wVEqoi
— ANI (@ANI) July 28, 2021
पी व्ही सिंधु(P.V Sindhu) हिने पहिला सेट २१ -९ अशा फरकाने केवळ १५ मिनिटात जिंकला. त्यानंतरच्या दुसर्या सेटमध्ये नगन यी चेंगने (Nagan Yi Chen) चांगलीच झुंज दिली. हा सेट जिंकण्यासाठी सिंधु हिला २१ मिनिटे लढत द्यावी लागली. केवळ ३५ मिनिटांच्या खेळात सिंधु हिने हा सामना आपल्या खिशात घातला.
Web Titel : Tokyo Olympics 2020 | Indian shuttler PV Sindhu beats Hong Kong’s Ngan Yi Cheung
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update