मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बुलढाण्यात एका आठ वर्षाच्या मुलाकडून कोरोना (Corona ) सेंटरचे टॉयलेट (Toilet) साफ करून घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे.
टॉयलेट (Toilet) ची स्वच्छता करतानाचा मुलाचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर त्याच्याकडून काम करून घेणार्या पंचायत समितीच्या अधिकार्याला निलंबित करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक छोटा मुलगा टॉयलेट (Toilet) साफ करत आहे. यासाठी एक माणून त्याला मराठीत सूचना सुद्धा करत आहे.
मागील तीन दिवसापासून वायरल होत असलेला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्याच्या मरोड गावातील आहे. हा व्हिडिओ गावातील जिल्हा परिषदेतच्या शाळेतील आहे, येथे सध्या प्रशासनाने आयसोलेशन सेंटर केले आहे.
सध्याच्या स्थितीत येथे कोरोना (Corona) रूग्ण दाखल आहेत. गाव समितीला समजले की, येथे जिल्हाधिकारी पाहणीसाठी येणार आहेत. मात्र कुणीही टॉयलेट (Toilet) साफ करण्यात तयार नव्हते. तेव्हा पंचायत समितीच्या एका अधिकार्याने आठ वर्षाच्या मुलांला धमकावून टॉयलेट साफ करून घेतले
मुलाने सांगितले की, टॉयलेट (Toilet) साफ करण्यासाठी त्याला काठीने मारण्याची धमकी दिली होती. टॉयलेट साफ करण्यासाठी त्याला पन्नास रुपये दिले होते.
माहितीनुसार, व्हिडिओमध्ये पंचायत समितीचा जो अधिकारी निर्देश देत आहे त्यास निलंबित केले आहे. तर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेला जबाबदारी अधिकार्यांवर कारवाईची करण्याची मागणी केली आहे.
कृपया हे देखील वाचा:
Microsoft 24 जूनला सादर करणार नवीन Windows, जाणून घ्या काय असू शकते खास
आगामी निवडणुकासाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा !
फायजर-मॉडर्नानंतर आता सीरमने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’
देशात कोरोना लसींची टंचाई असल्यानं मोदी सरकारनं घेतला हा मोठा निर्णय