पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Today petrol price | तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने दरवाढ केली जात आहे. तेल कंपन्यांनी २ दिवसांच्या खंडानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आज पेट्रोल प्रति लिटर ३४ पैशांनी महागले आहे. पुण्यात पेट्रोल(pune petrol)चा दर १०७.१६ रुपये लिटर झाले आहे. डिझेल(diesel)च्या दरात लिटरमागे १६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आता डिझेलचा दर ९५.६० रुपये लिटर झाला आहे.
पॉवर पेट्रोल(power petrol)च्या किंमतीतही लिटरमागे ३२ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर ११०.८४ रुपये झाला आहे. देशातील महानगरांमध्येही पेट्रोल डिझेलच्यात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.५४ रुपये तर डिझेल ८९.८७ रुपये लिटर झाले आहे. मुंबई(mumbai)त पेट्रोल १०७.५४ रुपये आणि डिझेल ९७.४५ रुपये लिटर झाले आहे. कोलकात्ता(Kolkata) येथे पेट्रोल १०१.७४ रुपये आणि डिझेल ९३.०२ रुपये लिटर झाले आहे. भोपाळ(Bhopal)मध्ये पेट्रोल १०९.८९ आणि डिझेल ९८.६७ रुपये लिटर झाले आहे.
web title: Today petrol price | Petrol diesel price hike again today; Find out today’s rates.
Pregnancy Bible | करीना कपूर-खान विरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल