बहुजननामा ऑनलाइन टीम – देशांतर्गत बाजारात चार कामकाजाच्या सत्रानंतर मंगळवारी (दि.15) पुन्हा एकदा सोन्याच्या दरात (Gold Rates Today) तेजी पहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 514 रुपये प्रति तोळाने (Today Gold Price)वाढले आहेत. चांदीचे दर तर 1000 पेक्षा जास्त भावाने वधारले आहेत. एक किलो चांदीची किंमत (Silver Rates Today) 1046 रुपये प्रति किलोने वाढली आहे. यापूर्वी सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 48 हजार 333 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 62 हजार 566 रुपये प्रति किलोवर होती.
जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यामुळे भारतात सोन्याचांदीच्या दरात वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत 514 रुपये प्रति तोळाने वाढ झाली आहे. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर दिल्लीमध्ये 48 हजार 874 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोमवारी दर 48 हजार 333 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1 हजार 845 डॉलर प्रति औंस झाले आहेत.
चांदीचे आजचे भाव (Silver Price)
चांदीच्या किमंतीमध्ये देखील जबरदस्त तेजी पहायला मिळाली. आज दिल्लीतील सराफा बाजारात चांदी 1 हजार 046 रुपये प्रति किलोने महागली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो 63 हजार 612 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) चांदीचे दर 23.16 डॉलर प्रति औंस आहेत.
यामुळे वाढले सोन्याचांदीचे भाव
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हॉइस प्रेसिडंट (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी यांनी सांगितले, मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये 8 पैशांची तेजी आली आहे. त्याचप्रमाणे सोन्याचांदीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमतीमध्ये तेजी आल्याने त्याच परिणाम देशांतर्गत बाजारातील किंमतीवर झाला आहे. असे असले तरी देखील कोरोना व्हॅक्सिनसंदर्भातील सकारात्मक बातम्यांमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव कायम आहे.