बहुजननामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील अलिगडमधून पुन्हा एकदा कुटुंब आणि नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एक दीर आपल्या वहिनीला कंटाळून कोर्टात पोहोचला आहे. दीराचा आरोप आहे की, वहिनीनं अश्लील व्हिडीओ दाखवून शारीरिक संबंध ठेवले आहेत. त्यामुळंच दीर आता कंटाळून कोर्टात पोहोचला आहे. अलिगडच्या बन्नादेवी क्षेत्रातील हा प्रकार आहे.
सदर दीरानं याआधी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याची तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. दीराचा आरोप आहे की, वहिनीनं त्याला धमकीही दिली होती की, कुणाला काही सांगितलं तर जीव घेईन.
यानंतर आता त्यानं कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. आता कोर्टाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. पीडित तरुणाचा आरोप आहे की, वहिनीनं अश्लील व्हिडीओ दाखवून संबंध ठेवण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला आहे. सदर तरुणानं आरोपपत्रात तसा उल्लेख देखील केला आहे.