मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काल संपूर्ण भारतात ७३ वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा केला गेला. पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासातही भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तेथे उपस्थित अधिकारी गौरव अहलुवालिया यांनी राष्ट्रध्वज फडकविला आणि राष्ट्रपतींचा संदेश वाचला. यावेळी भारतीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काश्मीरच्या मुद्यावर संतापुन पाकिस्तानने इस्लामाबादस्थित भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात परत येण्यास सांगितल्यानंतर पाकिस्तानने द्विपक्षीय व्यापार स्थगित केला. अजय बिसारिया यांच्या अनुपस्थितीत गौरव अहलूवालिया यांनी झेंडावंदन केले.
यावेळी भारताला जागतिक स्तरावरून देखील मोठ्या प्रमाणात अनेक देशांनी शुभेच्छा दिल्या. इजराईल आणि रशिया सारख्या बलाढ्य राष्ट्रांनी भारताला या विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेक राष्ट्रांत देखील भारताचा हा स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. त्याचबरोबर अनेक राष्ट्रांत देखील भारताचा हा स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. भारतासह चीन, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांत भारतीयांनी तिरंगा फडकावत भारताचा स्वतंत्रदिन उत्साहात साजरा केला.