बंगळुरु : वृत्तसंस्था – हजारो लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका स्कॅमचा आरोपी मंसूर खानने स्विमिंग पूलला नकली सोन्याने भरवलं होतं. त्याच्याकडे 5,880 नकली सोन्याच्या बिस्कीटाच्या रुपात 303 किलो सोनं सापडलं. हे पाहून अधिकारीही चकित झाले होते. अधिकारी या गोष्टीचा तपास करत आहे की, एवढ्या प्रमाणात असणाऱ्या नकली सोन्याच्या बिस्कीटांचा काय उपयोग होत होता किंवा होणार होता. कर्नाटकातील बंगळुरुमधील हा प्रकार आहे.
बंगळुरूमध्ये 30 हजार लोकांना करोडो रुपयांचा गंडा घालणारा आयएमएचा संस्थापक मंसूर खानच्या घरात एसआयटीला 303 किलो नकली सोन्याची बिस्कीटं सापडली आहे.
हे नकली सोनं स्विमिंग पूलमधून जप्त करण्यात आलं. या प्रकरणी वसीम नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. कोटींच्या ठेवींचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी आणि आयएमए ज्वेलर्सचा संस्थापक मंसूर खानला दिल्ली पोलिसांनी दुबईवरून परत आल्यानंतर नवी दिल्ली एअरपोर्टवरून ताब्यात घेतलं आहे. एसआयटीने केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे लुकआऊट नोटीस जारी करत इंटरपोलसहित सर्व संबंधितांना मंसूर खानची माहिती दिली.
मंसूर खानवर 30 हजार लोकांना फसवल्याचा आरोप आहे. तो एका महिन्याहून अधिक दिवस फरार होता. बुधवारी एसआयटीने बंगळुरू मधील घरातून 5,880 नकली सोन्याचे बिस्किट्स जप्त केले. या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 25 लोकांना अटक करण्यात आली आहे.