पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं संपुर्ण जगात थैमान घातलं आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात देखील कोरोनामुळं अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं महानगरपालिका प्रशासनानं शहरातील पुर्वेकडील काही परिसर सील देखील केला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 9 ते 11 वाजण्याच्या दरम्यान कोरोनामुळं तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तिघांचेही वय हे साधारण 60 च्या पुढं असल्याचं सांगितलं जातं आहे. मृत्यू झालेल्या दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता अशी माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधित तिघांचा मृत्यू झाल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
Three deaths have been reported in Pune today. All patients were #COVID19 positive and are cases of comorbidity. Death toll in Pune rises to 8: Naval Kishore Ram, District Magistrate of Pune, Maharashtra (File pic) pic.twitter.com/dQMUB8lBqc
— ANI (@ANI) April 7, 2020
कोरोनामुळं आज (मंगळवारी) तिघांचा मृत्यू झाल्यानं पुणे शहरात कोरोनामळं मृत्यू होणार्यांची संख्या आता 8 वर जाऊन पोहचली आहे. शहरातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर पडू नका परिवाराची काळजी घ्या असं आवाहन वेळोवेळी केलं आहे. तरी देखील काही नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून आले असून पुणे पोलिसांनी त्यांची वाहने देखील जप्त केली आहेत. मंगळवारी कोरोनामुळं पुण्यात तिघांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दुजोरा दिला आहे. पुण्यात मृत्यू होणार्यांची संख्या आता 8 वर जाऊन पोहचली आहे.