पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – एका तरुणीला माझ्याशी लग्न केले नाही तर आत्महत्या करेन, तुला अडकवून बदनामी करेन अशी धमकी देणाऱ्या तरुणावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी ते 5 मार्च 2021 दरम्यान ही घटना घडली.
वैभव पांडुरंग गावडे (रा. सध्या कात्रज, मूळ रा. बेळगाव, कर्नाटक), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही आपल्यासोबत लग्न करत नसल्याने गेल्या काही दिवसापासून आरोपीच्या मनात राग होता. त्यामुळे तो फिर्यादीची बहीण व नातेवाईकांना वारंवार फेसबुकवर तसेच फोनद्वारे त्यांच्याबद्दल वाईट बोलत असत. तसेच माझ्याशी लग्न केले नाही तर आत्महत्या करेन, तुला अडकवून बदनामी करीन, अशी धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.