अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक Meeting घेतली होती. या बैठकीत नगरच्या जिल्हाधिकारी यांनी केलेले सादरीकरण विशेष गाजले. मात्र, या बैठकीला Meeting जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा हेच गैरहजर असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी विचारणा केली असता डॉ. पोखरणा यांनी मी बैठकीला आलो होतो, मात्र हॉलचा दरवाजा बंद असल्याने बाहेरच उभा राहिलो, असा अजब खुलासा केला आहे.
या प्रकारानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी डॉ. पोखरणा यांच्यावर कारवाई करावी, असा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाकडे पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे रोजी बैठक घेतली होती. या बैठकिला देशातील निवडक जिल्हाधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला होता. यावळी राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.
या बैठकीमध्ये अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादरीकरण केले होते. तसेच हिवरे बाजारची यशोगाधा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक हे विषय गाजले. परंतु या बैठकीला डॉ. पोखरणा गैरहजर होते. हा प्रकार जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने घेतला आहे. तसेच डॉ. पोखरणा यांच्याकडे असलेली माहिती बैठकीदरम्यान देता आली नसल्याने सादरीकरणात अडचणी आल्या होत्या. बैठकीला गैरहजर राहिल्याचा खुलासा मागितला असता डॉ. पोखरणा यांनी आपण बैठकीला आलो होतो. मात्र, तेव्हा बैठकीच्या हॉलचा दरवाजा बंद होता. त्यामुळे आपण बाहेर उभे होतो, असा अजब खुलासा केला.
डॉ. पोखरणा यांनी केलेला खुलासा जिल्हाधिकारी यांना पटला नाही. बैठकीची आधीपासूनच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. जबाबदार अधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र, डॉ. पोखरणा उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांनी यासंदर्भात लेखी खुलासा देखील केला नाही. हे गंभीर असल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव आता जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या आरोग्य विभागाकडे पाठवला आहे. यावर राज्याचा आरोग्य विभाग काय निर्णय घेतो, डॉ. पोखरणा यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘त्या 12 आमदारांचा प्रस्ताव सरकारच्याच विचाराधीन ! नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?’
गरवारे शाळेत तरुणाचा खुन; आरोपींने स्वत येऊन सांगितला पोलिसांना घटनाक्रम
पाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या
मोदी सरकारचा भाडेकरूंसाठी मोठा निर्णय ! नवीन कायद्यानुसार पहिल्यांदाच मिळणार ‘हे’ अधिकार, जाणून घ्या
दररोज 1 ग्लास दूध पिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो? संशोधनावरील तज्ञांचे मत जाणून घ्या