चेन्नई : बहुजननामा ऑनलाईन – ‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता “असे वादग्रस्त विधान बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मियाम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी केले आहे.
चेन्नईतील अर्वाकुरची येथे पोटनिवडणूक होणार आहे तिथल्या एका प्रचार सभेत कमल हसन बोलत होते ‘स्वतंत्र भारतात पहिला दहशतवादी हिंदू. त्याचं नाव नथुराम गोडसे.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे .
भारतीय स्वातंत्र्यलढयाचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांचा खून नथुराम गोडसे याने केला आहे. त्यामुळे गोडसे याच्यावर सातत्याने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी, असा आरोप करण्यात येतो.गोडसेबद्दल केलेल्या या विधानावरून कमल हसन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत .
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक, गीतकार आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनीही ट्विटरवर याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. यात ते म्हणतात, ‘माझ्या एका मित्राने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी कोण अशा प्रश्न विचारला? त्यावर माझं उत्तर आहे गोडसे.’
Kamal Haasan during campaigning in Aravakurichi assembly constituency, Tamil Nadu, yesterday: "I am not saying this because many Muslims are here. I'm saying this in front of Mahatma Gandhi's statue. First terrorist in independent India is a Hindu, his name is Nathuram Godse." pic.twitter.com/LSDaNfOVK0
— ANI (@ANI) May 13, 2019