नागपूर बहुजननामा ऑनलाईन – संबंध महारष्ट्रामध्ये १ मे महाराष्ट्र दिन साजरा केला जातो पण तिकडे नागपूरमध्ये महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करण्यात आले. नागपूर येथील संविधान चौकावर विदर्भ बळीराजा पार्टी (तृतीयपंथी) आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान ‘हातात काळे झेंडे घेऊन हा महाराष्ट्र दिवस नाही, तर विदर्भ दिवस आहे’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या .दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनासाठी खूप मोठया प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. संविधान चौकाच्या बाजूला असलेल्या विधानभवन येथे चारही बाजुंना पोलीस बंदोबस्त होता. विदर्भ बळीराजा पार्टी (तृतीय पंथ) आंदोलनकर्त्यांनी अंगात काळे कपडे परिधान करून आंदोलनात सहभागी झाले होते .या आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेऊन महाराष्ट्र दिनाचा निषेध नोंदवत वेगळ्या विदर्भाची मागणी केली.