बहुजननामा ऑनलाईन – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकच्या कार्यवाहीचे एक वर्ष पूर्ण झाल्याच्या अंतर्गत आयोजित कार्यक्रमात संचार मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी बँक ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. आईपीपीबी ने बँक ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरु केली आहे. ज्याचा फायदा बँक ग्राहकांना होणार आहे.
कोणताही बँक ग्राहक पैसे काढू शकतो
एईपीएस सेवेअंतर्गत कोणताही बँक ग्राहक टपाल बँकेतून पैसे काढू शकतो आणि शिल्लक राहिलेल्या रक्कमेची माहिती ही घेऊ शकतो.
बँक खाते आणि आधार लिंक असणे गरजेचे
मात्र या सुविधेसाठी ग्राहकांना त्यांचे बँक खाते आधार कार्डाशी जोडणे बंधनकारक आहे. जर आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडले नसेल तर तुम्हाला हि सुविधा मिळणार नाही.
फिंगरप्रिंटमधूनही तुम्ही पैसे काढू शकता
या सुविधे अंतर्गत ग्राहक केवळ त्यांच्या बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) चिन्हाद्वारे हि पैसे काढू शकतो.
आयपीपीबी बनणार सगळ्यात मोठा इंटर-ऑपरेबल प्लेटफॉर्म
इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकचे सीईओ सुरेश सेठी यांनी सांगितले की, आयपीपीबी हा देशातील सगळ्यात मोठा इंटर-ऑपरेबल प्लेटफॉर्म बनणार आहे.
१,३६,००० पेक्षा जास्त पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध
आयपीपीबीची सुविधा १,३६,००० पेक्षा जास्त पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर याअंतर्गत १,९५,०० पोस्टमन आणि जीडीएस काम करणार आहेत.
१३ भाषांमध्ये बँकिंग सुविधा
आयपीपीबी १३ भाषांमध्ये सुलभ, स्वस्त दर आणि बँकिंग सुविधा प्रदान करणार आहे.
डिजिटल व्यवहार वाढविणे ध्येय
आयपीपीबीचे उद्दिष्ट देशातील डिजिटल व्यवहार वाढविणे आहे.
मिळणार या सुविधा
आयपीपीबी मध्ये तुम्हाला चालू खाते, बचत खाते, मनी ट्रान्सफर, डीबीटी, बिल उपयुक्तता, एंटरप्राइझ आणि व्यवसायाशी संबंधित पेमेंट सेवांची सुविधा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम मध्ये या पेमेंट बँकेचे उद्घाटन केले आहे.
पाच कोटी ग्राहक तयार करण्याचे लक्ष्य
रविशंकर प्रसाद यांनी पुढच्या एका वर्षात आयपीपीबी अंतर्गत पाच कोटी ग्राहक तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
मालक कोण
इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही भारत सरकारच्या टपाल विभाग आणि संचार मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.
कोण आहे सीईओ
आयपीपीबीचे सीईओ आणि एमडी सुरेश सेठी आहेत. सरकारने २३ ऑक्टोबर २०१७ रोजी या पदावर त्यांची नेमणूक केली होती.