थेऊर : बहुजननामा ऑनलाईन – गेली आठ महिने दर्शना पासून वंचित असलेल्या चिंतामणी गणपती भक्तांची प्रतिक्षा संपली असून उद्या सोमवारी मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत.शासनाच्या या निर्णयाचा सर्वच भाविकामधून स्वागत होत आहे.
जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने मार्चमध्ये देशात लाॅकडाऊन जाहिर केले सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली.भारत हा धार्मिक देश असल्याने देशातील जवळपास सगळेच नागरीक आपापल्या आराध्य देवतांची मनोभावे पूजा करत असतात.देशात आनलाॅक जाहिर झाल्यानंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत होत असताना शाळा व धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी होत होती अनेक ठिकाणी अंदोलन झाली परंतु महाराष्ट्र शासनाने कोणताही धोका नको म्हणून देऊळे उघडण्याची परवानगी दिली नाही परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर हा निर्णय आल्याने सर्व भाविक आनंदी झाले आहेत.
थेऊर येथील बाजारपेठच येणार्या पर्यटकावर अवलंबून असल्यामुळे गेली आठ महिने मुख्य चौकातील सर्व व्यवहार बंद होते परंतु उद्या मंदिर उघडणार असल्याने चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. येथील हारफुल व्यावसायिक गजानन आगलावे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे आमचा व्यवसाय चालू होऊन कुटूंबाला उत्पन्नाचे साधन मिळणार आहे तसेच खेळणी व फोटो विक्रेते विशाल काळे याचे स्वागत करताना गेली आठ महिने दुकाने बंद असल्याने मोठे नुकसान झाल्याचे सांगितले.
याविषयी थेऊरचे ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसागर यांनी सांगितले की चिंतामणी मंदिर दर्शनासाठी उघडे झाल्याने आमचीही जबाबदारी वाढली आहे तसेच चिंचवड देवस्थानच्या वतीने मंदिरातील व्यवस्था केली की नाही यावरही आमचे लक्ष असणार आहे भाविकांना सुरळीत व सुरक्षित दर्शन व्हावे यासाठी देवस्थान निश्चित जबाबदारी पार पाडेल अशी आशा आहे.भाविकांनी सुध्दा कोरोना संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे.