थेऊर : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना संक्रमणाची भिती जवळपास हद्दपार झाली असे चित्र आज थेऊर या अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र येथे अनुभवास आली आज संकष्टी चतुर्थी असल्याने येथील श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
मार्च 2020 मध्ये संपूर्ण देशात लाॅकडाऊन झाल्यानंतर धार्मिक स्थळे पूर्ण बंद करण्यात आली होती.दिवाळीच्या पाडव्याला धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली केल्यानंतर भाविक बाहेर पडण्यास घाबरत होते.परंतु भारताने कोरोनावर लस विकसित करुन त्याचे डोस देण्यास सुरुवात केल्यानंतर तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय कमी आल्यावर सध्या भाविकांची धार्मिक स्थळावर गर्दी वाढली आहे.
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पहाटे पासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या पहाटे पाच वाजता देवालयाचे पुजारी सुधीर आगलावे यांनी महापुजा केली व मंदिर दर्शनासाठी खुले केले त्यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी महापुजा केली. संपूर्ण देऊळवाड्यात रंगीबेरंगी फुलांनी फुग्यांनी सजावट केली होती.
भाविकांची गर्दी लक्षात घेऊन लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी चोख व्यवस्था ठेवली होती होमगार्ड व चिंचवड देवस्थानचे सुरक्षा रक्षक यांनी भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी छान व्यवस्था ठेवली.