नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील वॅकफिट या स्टार्टअप कंपनीने ड्रॉच्या माध्यमातून १.७ लाख अर्जांपैकी २१ भारतीय आणि दोन परदेशी लोकांची सोन्याच्या नोकरीसाठी निवड झाली आहे. या निवडलेल्या लोकांना १०० दिवस रात्री ९ तास झोपावे लागेल आणि यासाठी कंपनी एक लाख रुपये देणार आहे. निवडलेले लोकच कंपनीच्या गादीवर झोपतील. यासह, स्लीप ट्रॅकर्स आणि तज्ञ यांच्यासमवेत समुपदेशन सत्रातही ते सहभागी होतील. या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या लोकांना व्हिडिओ पाठवावा लागणार असून यात त्यांना झोपायला किती आवडते, हे सांगावे लागेल.
“आता तुम्ही फक्त झोपता, तुम्ही जितका वेळ झोपू शकता, जितके गाढ झोपू शकता. तुम्ही आराम करा, बाकीचे आमच्याकडे सोडा,” असे कंपनीने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवडलेल्या २३ लोकांना स्लीप ट्रॅकर देखील देणार असून या इंटर्नला कंपनीद्वारे प्रदान केलेल्या गादीवर १०० दिवसांसाठी ९ तास आणि आठवड्यातून सात रात्र घरीच झोपवे लागेल. २१ भारतीय मुंबई, बंगळुरू, नोएडा, आग्रा, गुरुग्राम, दिल्ली, चेन्नई, पुणे, भोपाळ येथून निवड झाली असून एक-एक व्यक्ती अमेरिका आणि स्लोव्हाकियातुन निवडला जाणार आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.
आपली जुनी पर्मनन्ट नोकरी सोडावी लागणार नाही, ही या नोकरीबद्दल सर्वात चांगली गोष्ट आहे. तसेच आपण आपल्या रोजच्या कामासह घरी देखील हे काम करू शकता. या नोकरीसाठी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी अर्ज मागवले असताना त्यापैकी प्राप्त व्हिडिओ पाहून या लोकांची निवड झाली आहे.
अंतिम फेरीत अभिनेते व लेखक शिवनजितसिंग परिहार, अभिनेता नवीन कौशिक, टीव्ही अँकर सायरस ब्रोचा (टीव्ही अँकर) आणि कॉमेडियन मल्लिका दुआ चार जणांची यांची जज म्हणून निवड केली आहे.