मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बंडखोरी करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच भूमिका जाहीर केली आहे. ‘मी राष्ट्रवादीतच असून आदरणीय शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी मिळवून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊ’, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे. शरद पवारांनी अजित पवार यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच उद्धवत नाही. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसला एकमताने सहकार्य करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
There is no question of forming an alliance with @BJP4Maharashtra.
NCP has unanimously decided to ally with @ShivSena & @INCMaharashtra to form the government. Shri Ajit Pawar’s statement is false and misleading in order to create confusion and false perception among the people.— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 24, 2019
तसेच अजित पवारांनी केलेले ट्विट लोकांमध्ये संभ्रम आणि खोटा समज निर्माण करण्यासाठी आहे. अजित पवार यांनी केलेले ट्विट खोटे विधान खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. तर जयंत पाटील यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहात. आदरणीय पवार साहेबांच्या सावलीत आपण सगळेच वाढलो आहोत. मात्र, राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. साहेबांच्या या निर्णयाचा आदर ठेवून आपण परत या. असे ट्विट केले आहे.
I am in the NCP and shall always be in the NCP and @PawarSpeaks Saheb is our leader.
Our BJP-NCP alliance shall provide a stable Government in Maharashtra for the next five years which will work sincerely for the welfare of the State and its people.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
दरम्यान, अजित पवार यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी ‘काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. सर्व काही आलबेल आहे. फक्त थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यासाठी आभार’, असे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न अद्याप सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
There is absolutely no need to worry, all is well. However a little patience is required. Thank you very much for all your support.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019