बंगळुरू : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं नेत्तृव करणाऱ्या ‘महात्मा गांधी यांचा खून करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता’ या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याचं भाजपच्या आणखी एका नेत्यानं समर्थन केलं आहे. ‘साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेलं वक्तव्य योग्यच आहे,’ असं भाजप नेते केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वीचं समर्थन करताना म्हंटल आहे .
या प्रकरणासंदर्भात हेगडे एक ट्विट केलं आहे त्यात म्हणतात कि ,नथुराम गोडसेबद्दल चर्चा झाली पाहिजे, सत्तर वर्षानंतरही आजची पिढी याबाबत बोलते याबद्दल मला आनंद वाटतो. साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागायची गरज नाही. ही चर्चा ऐकून आज नथुराम गोडसेंना चांगलं वाटत असेल,’ असं अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं आहे. ‘ असे त्यांनी ट्विटमधून साध्वींचे समर्थन केले. अनंत कुमार हेगडे सातत्याने वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात .