मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – 2016-17 मध्ये भाजपचे खासदार असताना नाना पटोले (Nana Patole) यांचा फोन टॅप केला जात होता. नाना पटोले (Nana Patole) यांच्या आरोपात दम आहे. असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्या आरोपाचे समर्थन केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पटोले यांनी म्हटल्याप्रमाणे तेव्हा अमजद खान या नावाच्या ड्रग तस्कराच्या नावाने त्यांचा फोन टॅप करण्यात येत होता. त्यावेळी ते भाजपचे खासदार होते. आता नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आहे.
या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, नाना पटोले यांच्या आरोपात तथ्य आहे.
There is a fact in Nana Patole's complaint about phone tapping. Phone taping of political leaders & public representatives was done by giving false names. It has happened in Nana Patole's case too. HM has announced a high-level committee to enquire: Maharashtra Dy CM Ajit Pawar pic.twitter.com/qTpEORn87Q
— ANI (@ANI) July 10, 2021
राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांचे फोन खोटी नावे देऊन टॅप केले जात होती. असेच नाना पटोले यांच्याबरोबरही घडले आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी अथवा सार्वजनिक सुरक्षिततेसाठी करण्यात आले तर ठीक आहे. पण वैयक्तिक फायद्यासाठी असे करणे बेकायदेशीर आणि लोकशाही विरोधी आहे, असे पवार यांनी सांगितले.
Web Title : there is a fact in nana patoles complaint about phone tapping phone taping of political leaders public representatives was done by giving false names it has happened in nana patoles case too
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा
Covid 19 | हवेत आहे का कोरोना? आता ‘या’ डिव्हाईसने समजू शकते, जाणून घ्या कसं काम करतो