पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत परत एकदा मोठ्या संख्येने वाढ होताना दिसून येत आहे. शहरात आज दिवसभरात 465 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 184 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये उपचार घेणाऱ्या 2 हजार 156 रुग्णांपैकी 154 कोरोनाबाधित रुग्ण गंभीर असून 308 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. शहरात 4 हजार 424 टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये 465 कोरोनाबाधित रुग्ण मिळाले असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. यावेळी बोलताना मागील 8 ते 10 दिवसात शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र परिस्थीती चिंतनाजनक नसल्याचे महापौरांनी माहिती देताना सांगितले आहे.
In last 8-10 days, no. of patients has been increasing but the situation is not worrisome. We're on alert. We've decided to increase COVID19 testing. There is a chance of making the COVID19 rules more strict if the number of cases rises: Pune Mayor Murlidhar Mohol pic.twitter.com/6apLqdiXFx
— ANI (@ANI) February 18, 2021
तसेच रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी प्रशासन सतर्क असून Covid19 च्या चाचण्या वाठविण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला असल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये जर अशीच वाढ झाली तर शहरात आणखी कडक निर्बंध लावल्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.