मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब अहमदाबाद आणि दिल्ली दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतासोबतच्या व्यापर संबंधी करार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारत दौऱ्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. अहमदाबाद येथे ट्रम्प येणार असून तेथून ते साबरमती आश्रमला भेट आणि केम छो मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. अहमदाबाद भेटीमुळे ट्रम्प यांच्यावर सध्या टीका होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, आता महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात एकाच गोष्टीची चर्चा आहे. ती म्हणजे शिवथाळी. पुर्ण देशाला आश्चर्य वाटत आहे, डोनाल्ड ट्रम्प मुंबईत आले असले तर त्यांनीही शिवथाळीची चव चाखली असती. राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्राची थाळी या कार्यक्रमाला ट्रम्प आणि त्यांची पत्नी येऊन रांगेत उभे राहून शिवथाळीचा आस्वाद घेतला असता, असा टोला त्यांनी लगावला आहे. यापुर्वीही मनसेने ट्रम्प यांना अहमदाबादेत का ? असा प्रश्न उपस्थित केला होता.
भारताला भेट देणारे ट्रम्प हे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षाच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्लू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता. इतरांच्या आणि ट्रम्प यांच्या दौऱ्यात दोन लक्षणीय फरक आहे. इतरांनी भारतासोबत पाकिस्तान किंवा शेजारच्या अन्य देशानांही भेटी दिल्या होत्या. ट्रम्प मात्र फक्त भारताचा दौरा करणार आहे आणि दुसरे असे आहे की, इतर राष्ट्राध्यक्षांचे दौरे शासकीय व राजनैतिक पातळीवरचे होते. ट्रम्प यांच्या एकूण 36 तासाच्या दौऱ्यात मात्र या अधिकृत कामांसाठी ठेवलेला वेळ तीन तासाचा आहे. मंगळवारी दुपारी दिल्लीत ट्रम्प आणि मोदी यांच्यात सुमारे दीड तास अधिकृत भेट आणि चर्चा होणार आहे. ट्रम्प जरी भारतात येणार असले तरी मोदी अमेरिकेला चार वेळा गेले आहे. तेथे त्यांनी तीन वेळा भेट झाली असून दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत ‘रेपो’ हे या देशाच्या दौऱ्याच्या यशापयशाचे मुख्य गमक असणार आहे.
ट्रम्प हे अमेरिकेसारख्या स्वतःस महासत्ता वैगेरे समजणाऱ्या व त्याबरहुकूम जगात फौजदारी करणाऱ्या देशाचे अध्यक्ष आहेत. ट्रम्प येतील व जातील त्यांच्या येण्या-जाण्याच्या खुणाही देशाच्या मातीत राहणार नाही. ट्रम्प यांनी तिकडे वॉशिंग्टनमध्ये सांगितले की, ‘मी हिंदुस्थान भेटीवर जात आहे व तिथे पंतप्रधान मोदी यांच्याशी व्यापारवर चर्चा होणार आहे.’ यावरुन असे स्पष्ट होते की, त्यांनी व्यापार वाढवायचा आहे. त्यासाठी ते 36 तासांसाठी येत आहे. ट्रम्प भारतात आल्याने येथील गोरगरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कानामात्रेचा फरक पडणार नाही. मग ट्रम्प यांच्या येण्याचे येथील जनतेला कौतुक किंवा उत्सुकता असण्याचा प्रश्न येतोच कुठे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.