नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ८ फेब्रुवारीला होणाऱ्या दिल्लीतील मतदानाआधीच ओपिनियन पोलद्वारे दिल्लीत पुन्हा ‘आप’चीच सत्ता येणार असल्याचा दावा आहे. दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये मुख्य स्पर्धा सुरु असून यामध्ये काँग्रेस मात्र खूपच मागे आहे. २०१५ प्रमाणे ‘आप’ मतांच्या टक्केवारीच्या बाबतीतही आघाडीवर असून त्यांच्या मतांची टक्केवारी ३ टक्क्यांनी कमी होत आहे.
एका वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र दिसत आहे. २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ५५ टक्के मत मिळवलेल्या ‘आप’ला यावेळी ५२ टक्के आणि भाजपाला ३४ टाके मते मिळाली आहेत. दिल्लीच्या जागांमध्ये मागील वेळेच्या तुलनेत ‘आप’ यावेळी ७-१३ जागा गमवाव्या लागतील.
मागच्या वेळी ७० जागा जिंकणारा पक्ष ५४-६० जागा जिंकू शकतो. तर भाजपाला १०-१४ जागा मिळतील असा अंदाज आहे. या स्पर्धेत काँग्रेस कुठेही दिसत नसून याहीवेळी ०-२ जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. तर एकीकडे ५१ टक्के लोकं शाहीन बागेत चालू असलेल्या सीएए विरुद्धचा निषेध योग्य मानत नसून २५ टक्के लोकांना ते योग्य असल्याचे मानतात.