बहुजननामा ऑनलाइन – पत्नीने साथ सोडली तरीही कर्नाटकातील एका व्यापार्याने पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर घरी हुबेहुब तिचा मेणाचा पुतळा आणला होता. त्यानंतर आता असाच प्रकार तेलंगणामध्ये घडला आहे. तेलंगणा इथे 74 वर्षीय व्यक्तीने पत्नी आजारपणात साथ सोडून गेल्यानंतर त्यानं घरी हुबेहुब तिचा पुतळा आणला आहे.
Tamil Nadu: Sethuraman, a businessman from Madurai unveiled a statue of his wife,Pitchaimaniammal,at his home after 30 days of her demise.
He says,"I lost my wife recently but when I look at this statue I can connect with her.Fibre,rubber & special colours were used to make it" pic.twitter.com/l5iykI8UCw
— ANI (@ANI) September 11, 2020
पत्नीची कमतरता भासू नये जरी पत्नी आजारपणामुळे सोडून गेली असली तरी तिचा सहवास असावा ती जवळ आहे ही भावना कायम राहावी यासाठी या व्यक्तीने पत्नीचा हुबेहुब पुतळा तयार करून घेतला आहे. त्यांचा पत्नीचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. यामुळे व्यावसायिक असणार्या त्यांच्या पतीच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. ही भरून काढण्यासाठी त्यांनी पत्नीसारखा दिसणारा हुबेहुब पुतळा तयार करून घेतला. जेव्हा जेव्हा मी या पुतळ्याकडे पाहातो तेव्हा मला खूप बरे वाटते, ती माझ्यासोबत असल्यासारखे अनुभव मला येतो. माझ्या व्यवसायात तिने मला मोलाची साथ दिली. असे सेथुरमण यांनी म्हटले आहे.