पोलीसनामा ऑनलाइन टीम – 349 रुपयांचा एअरटेल प्रीपेड प्लॅन- हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो. 2GB डेटा संपल्यानंतर, इंटरनेटची गती 64Kbps होते. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मॅसेजचा देखील समावेश आहे. या प्लॅनसोबत 28 दिवसांच्या Amazon Prime चे सब्सक्रिप्शन देखील विनामूल्य मिळते. याशिवाय या प्लॅनमध्ये Airtel XStream premium, फ्री हॅलोट्यून, Wynk Music, फ्री ऑनलाईन कोर्स आणि फास्टटॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळतो.
या प्लॅनव्यतिरिक्त एअरटेलचे इतरही प्लॅन्स आहेत. ज्यामध्ये डेटा, अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि स्ट्रीमिंग सर्व्हिस समाविष्ट आहे. वापरकर्ते 289 रुपये, 448 रुपये, 599 रुपये आणि 2698 रुपयांचा प्लॅन घेऊ शकतात.
Airtel चा 289 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
हा प्लॅन दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंगसह येतो. 28 दिवसांच्या वैधतेसह आलेल्या या प्लॅनमध्ये Zee5 premium चे सब्सक्रिप्शन विनामूल्य उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये Airtel XStream premium, फ्री हॅलोट्यून, Wynk Music, फ्री ऑनलाईन कोर्स आणि फास्टटॅग ट्रान्झॅक्शनवर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.
Airtel चा 401 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
हा प्लॅन 30GB डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चे वर्षभराचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन विनामूल्य उपलब्ध आहे. हा प्लॅन केवळ डेटासह येतो. या प्लॅनसोबत कोणत्याही प्रकारचे कॉलिंग बेनिफिट उपलब्ध नाही.
Airtel चा 448 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
500 रुपयांच्या आत येणारा हा एक उत्तम प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चे वर्षभराचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन विनामूल्य मिळते. हा प्लॅन दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगसह येतो. याशिवाय या प्लॅनमध्ये Airtel XStream premium, फ्री हॅलोट्यून, Wynk Music, फ्री Shaw Academy चा कोर्स आणि फास्टटॅग ट्रान्झॅक्शनवर 150 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळतो.
Airtel चा 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
हा प्लॅन 2GB डेली डेटासह येतो. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. या प्लॅनसोबत अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चे वर्षभराचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन देखील विनामूल्य मिळते. या प्लॅनमध्ये Airtel XStream premium, फ्री हॅलोट्यून, Wynk Music, विनामूल्य ऑनलाइन कोर्सचा समावेश आहे.
Airtel चा 2698 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
हा एक दीर्घ मुदतीचा प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. यात दररोज 2GB डेटा मिळतो. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील या प्लॅनमध्ये येतात. या प्लॅनमध्ये देखील Disney+ Hotstar चे वर्षभराचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन विनामूल्य उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये देखील वरील प्लॅनमधील सर्व फायद्यांचा समावेश आहे.