बहुजननामा ऑनलाईन
जर नेल पेंट किंवा नेल आर्ट पसंत आहे, तर नखांची काळजी घेणे सुद्धा जरूरी आहे. नेहमी स्त्रिया नेल पेंट तर लावतात, परंतु नखांची काळजी घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांची नखं तुटू लागतात किंवा पिवळी पडू लागतात. आपल्या नखांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेवूयात…
अशी करा देखभाल
1 स्क्रबिंग करा
मेनिक्युअरची सुरूवात होते हाताच्या योग्य पद्धतीने स्क्रबिंगपासून. हाताची धूळ, माती जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत हे करा. चांगल्या क्वालिटीचे नेल्स फायलर वापरा. नखांच्या आजूबाजूची कोरडी त्वचा क्यूटिकल क्लिपर्सने हटवा.
2 नेल पेंट लावा
नखं परफेक्ट शेपमध्ये फाइल केल्यानंतर बेस कोट कलरने नेल्सला पेंट करा. हा बेस कोट पातळ ठेवा. आजूबाजूच्या त्वचेला पेट्रोलियम जेली लावले तर नेल पॉलिश त्वचेवर चिकटणार नाही.
3 फिनिश टच द्या
नेल पेंट नखांच्या खालच्या भागाला लागणार नाही याची काळजी घ्या. फिनिश टच देण्यासाठी नखांवर ट्रान्स्परंट नेल पॉलिशचा कोट द्या. यामुळे मेनिक्युअर खुप दिवस राहील. नखांना ग्लॉस फिनिश येईल.
एक्सपर्टचा सल्ला
1 कडक उन्हामुळे सुद्धा नखे पिवळी पडू शकतात. यासाठी सनस्क्रीनचा वापर करा. नेल पेंट लावण्यापूर्वी बसेकोट अप्लाय करा. यामुळे नखांचे संरक्षण होते आणि पिवळी पडत नाहीत.
2 डिटर्जंट आणि साबणाच्या वापरानंतर नखांवर मसाज क्रिम रोज लावा.
3 क्रिम लावल्यानंतर कॉटनने हळुहळु पुसून काढा.
4 रात्री झोपताना सुद्धा कोणत्याही चांगल्या तेलाने हातांचा मसाज करा.
हे घरगुती उपाय करा
1. नखं चमकदार बनवण्यासाठी एक टीस्पून जिलेटिन गरम पाण्यात टाका. पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये सॅट्रिक ज्यूस टाका, नंतर नखं स्वच्छ करा.
2. पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि 15 मिनिटे हात त्यामध्ये ठेवा. यानंतर कॉटन बॉल्सने पुसून घ्या.
3. पिवळसर पणापासून वाचवण्यासाठी पाण्यात लिंबू पिळा आणि त्यामध्ये 10 मिनिटांपर्यंत हात बुडवून ठेवा.