नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस पक्षामध्ये वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अखरेचा टप्पा शिल्लक असताना पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.एका वृत्त संस्थेंच्या माहितीनुसार २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘नीच प्रकारचा माणूस’ असा आपण केलेला योग्यच होता, असे सांगणारा लेख अय्यर यांनी लिहिला आहे.
मोदींनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांचा आधार घेत मी तेव्हा बरोबर भविष्यवाणी केली होती की नाही? असे अय्यर यांनी या लेखात म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा मणिशंकर अय्यर कॉंग्रेसला अडचणीत आणू शकतात.अशी चर्चा सुरु आहे .
दरम्यान,गेल्या डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा जवळ आला असताना, अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख “नीच किस्म का आदमी’ असा केला होता. त्यावरून चांगलाच गदारोळ झाला होता. वास्तविक पाहता यामध्ये त्यांनी जातिवाचक उल्लेख बिलकुल केलेला नव्हता. तर वाईट स्वभावाबद्दल केलेली ती टीका होती. परंतु मोदी यांनी “नीच’ हा शब्द जातीशी जोडला. त्यामुळे या गोष्टीचा विपरीत परिणाम कॉंग्रेसच्या मतावर होऊ नये, म्हणून अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. अय्यर यांनी पंतप्रधानांची माफी मागावी, अशी ट्विप्पणीही राहुल गांधी यांनी केली होती.
Congress leader Mani Shankar Aiyar said that he stands by his 'neech aadmi' jibe against Narendra Modi and termed his Dec 2017 remark about the Prime Minister as "prophetic".
Read @ANI Story | https://t.co/kJw1nehGSS pic.twitter.com/hEZKugYATZ
— ANI Digital (@ani_digital) May 14, 2019