नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – सैनिकांना मिळणारे निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा मुद्दा प्रसारमाध्यमांच्यामार्फत मांडणारे बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार होते पण निवडणूक आयोगाने यादव यांचा अर्ज बाद केल्याच्याविरोधात तेज बहादूर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, आज तेज बहादूर यांची याचिका फेटाळण्यात आली. जनहित याचिकेच्या आधाराने यामध्ये हस्तक्षेप करण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.
दरम्यान ,तेज बहादुर यादव यांना समाजवादी पक्षाने उमेदवारी दिली होती .निवडणूक अर्जासोबत त्यांनी एक अपेक्षित सर्टिफिकेट सादर न केल्याने त्यांचा अर्जच बाद करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.त्याचा निकाल आज जाहीर झाला.