लोकसहभागातून तलावाची गळती थांबली, गाव झाले पाणीदार

July 11, 2019

लोहा बहुजननामा ऑनलाईन – नांदेड जिल्ह्यातील अतिदुष्काळ ग्रस्त गाव, या ठिकाणी गावतलावं होता तो पण गळका, चार महिने गावाला ३ किमी वरून डोंगर चढून पाणी आणावे लागत असे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुष्काळ विमोचन समितीने लोकसहभागातून पाण्याच्या टँकरने पाणी पुरविले तसेच गावातील तलावाची दुरुस्ती, खोलीकरण केले तर गावाची पाण्याची समस्या सुटू शकते असे बाबुराव केंद्रे यांनी समितीच्या लक्षात आणून दिले .लोकसहभागातून कमला सुरवात केली त्यामुळे आज गावाची पाण्याची अडचण दूर झाली असून गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वरील कामासाठी श्री दिपक मोरताळे यांनी श्री सुधाकर बंडेवार यांच्याशी संपर्क साधला, श्री सुधाकर बंडेवार यांनी त्यांच्या मित्र श्री मिर्झा बेग यांच्याशी चर्चा अनोखा उपक्रम राबवत मुलीच्या लग्नातील पत्रिकेचा खर्च कमी करून या कार्यास २१००० रुपये देऊन कामाची सुरवात केली.कामासाठी लागणारी मशीन सूर्योदय फौंडेशन च्या मार्फत उपलब्ध करून दिली. नांदेड जिल्हा माहेश्वरी महिला मंडळाने कामास हातभार लागावा म्हणून दुरुस्ती साठी-१५००० रु दिले दुष्काळ विमोचन समितीच्या फंडातून ४०००० रु देण्यात आले. या मिळालेल्या मदतीमुळे तलावाचे खोलीकरण तसेच उंचीही वाढण्यास मदत झाली.

वरील काम श्री दिपक मोरताळे, श्री बाबुराव केंद्रे , श्री उदय संगरेड्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली १० दिवसात काम पूर्ण झाले ,येथे २ कोटी लिटर पेक्षा जास्त पाणीसाठा राहणार आहे.दोन दिवसांच्या पाऊसात ३० % तलाव भरला आहे,गळतीही थांबली आहे.यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.