बहुजननामा ऑनलाइन टीम –
केंद्र सरकार रस्ते दुघर्टनेतील जखमी लोकांवर मोफत उपचारासाठी योजना तयार करत आहे. या अंतर्गत दुर्घटनेत जखमी होणार्या प्रति व्यक्तीवर अडीच लाखांपर्यंतचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. ही मोफत उपचाराची योजना टोल टॅक्सला जोडण्याची तयारी केली जात आहे. दरम्यान, 1 सप्टेंबरपासून टोल टॅक्स वाढवण्यात आला आहे.
रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या सूत्रांनुसार या योजनेंतर्गत हिट अँड रन पीडित किंवा थर्ड पाटी विमा रहित वाहनांच्या अपघातातील जखमी लोकांवर कॅशलेस ट्रीटमेंट केली जाईल.
वेगळ्या निधीची तरतूद
योजनेची योग्यप्रकारे अंमलबाजवणी करता यावी म्हणून वेगळा मोटर व्हीकल एक्सीडेंट फंड बनवला जाईल. यामध्ये नॅशनल हेल्थ अथॉरिटी नोडल एजन्सी म्हणून काम करेल. यासाठी सरकारकडून प्रत्येक वर्षी सुमारे 2000 कोटी रुपये दिले जातील. यासाठी मंत्रालयाने मसूदा तयार केला आहे. सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.
उद्यापासून वाढणार टोल टॅक्सचे दर
टोल प्लाझावरून जाणार्या वाहनांना 1 सप्टेंबरपासून जादा टोल टॅक्स भरावा लागणार आहे. वाढवण्यात आलेली रक्कम आणि व्यावसायिक वाहनांना निर्धारित केलेल्या वेगवेगळ्या दरांच्या हिशेबाने पाच ते दहा रूपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. रस्ते आणि परिवाहन मंत्रालयानुसार मॉडल कॉन्ट्रॅक्ट अॅग्रीमेंटअंतर्गत टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.