सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा हाहाकार सुरु असून सोलापुरात बुधवारी कोरोनाची बाधा झालेले आठ नवे रूग्ण आढळून आले. त्यापैकी एका पोलीस हवालदाराचाकोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधा झालेल्यांपैकी तीन पोलिसांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 153 तर मृतांची संख्या 10 गेली आहे.
कोरोनाने बळी घेतलेल्या पोलीस हवालदाराचे वय 57 वर्षांचे होते. येत्या काही महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात ते नेमणुकीस होते. त्याला काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. मात्र, चाचणी अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. दुसर्या दिवशी अहवाल प्राप्त झाला असता त्यात मृत हवालदाराला कोरोनाची बाधा झाली होती, हे स्पष्ट झाले. यापूर्वी, सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलिसांना करोनाबाधा झाली आहे.