बहुजननामा ऑनलाइन टीम – दिर्घकालीन लॉकडाउननंतर आता मुलांना पुन्हा शाळेत पाठवणे खूप गरजेचे आहे. मुलांना शाळेपासून, शिक्षणापासून वंचित ठेवणे हे खतरनाक व्हायरसच्या तुलनेत जास्त नुकसान करणारे ठरु शकते असे मत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी व्यक्त केले आहे.
विंटर सेशनमध्ये म्हणजेच हिवाळ्याच्या कालावधीमध्ये सुरु होणारे शाळांच्या दुसर्या सत्रांबद्दल विचार विनिमय सुरु असतानाच पंतप्रधांनी असे आवाहन केल्याने त्याला अधिक महत्व प्राप्त झाले आङे. स्कॉटलॅण्ड आणि उत्तर आर्यरलॅण्डमधील शाळा सुरु करण्यात येणार असून त्यानंतर पुढील आठवड्यात इंग्लंड आणि वेल्समधील शाळा पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. जॉनसन यांनी इंग्लंडचे मुख्य आरोग्य अधिकारी आणि ब्रिटनच्या इतर प्रदेशातील समिक्षकांनी जारी केलेल्या एका संयुक्त पत्रकाचा आधार घेत मुलांना कोरोना विषाणूचा धोका खूपच कमी असल्याचे अधोरेखित केले आहे. तसेच मुलांना आणखीन काळ शाळांपासून दूर ठेवल्यास त्यांच्या कौशल्यावर आणि अभ्यासावर वाईट परिणाम होऊ शकतो असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. जॉनसन यांनी डाउनिंग स्ट्रीटमधील एका वक्तव्यामध्ये, मुख्य आरोग्य अधिकारी सांगतात त्याप्रमाणे, शाळांमध्ये करोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूपच कमी आहे. मुलांना जास्त काळ शाळा आणि शिक्षणापासून लांब ठेवणं त्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच, कौशल्य आणि आरोग्यासाठी जास्त धोकादायक असल्याचे म्हटले आहे.