नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – सैनिकांना मिळणारे निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा मुद्दा प्रसारमाध्यमांच्यामार्फत मांडणारे बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूकीसाठी उभा राहण्याचे ठरवले होते . परंतु निवडणूक आयोगाने यादव यांची उमेदवारी रद्द केल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.तसेच निवडणूक आयोगाला २४ तासात उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना सपा-बसपा आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदार संघातून उमेदवारी दिली होती. मात्र, तेज बहादूर यादव यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आला आहे. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.