मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कानपुरमधील एका विद्यार्थिनीला नोकरीच्या बहाण्याने हॉटेलवर बोलावून एका व्यावसायिकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला याप्रकरणी अटक केली आहे.
मूळची महोबा येथील रहिवासी असलेली हि २२ वर्षीय युवती येथील एका भाड्याच्या खोलीत राहत असून ती एका परीक्षेची तयारी करत आहे. काही वर्षांपूर्वी तिची भेट येथील एक व्यावसायिक हरीश चंद्र पांडे याच्याबरोबर झाली होती. त्यानंतर ते एकमेकांशी मोबाईलवर आणि व्हाट्सअप वर संपर्क करत होते. कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी हरीशचंद्रने तिला आमिष दाखविले, असा महिलेचा आरोप आहे. मंगळवारी त्याने कॉल सेंटरच्या संचालकाशी बोलण्याच्या बहाण्याने मला एका ठिकाणी बोलावले. त्यानंतर त्याच्या कारमधून तो मला एका हॉटेलमध्ये घेऊन आला. त्यानंतर पेयामध्ये बेशुद्धीचे औषध देऊन माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने पोलिसांत येऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
दरम्यान, स्टेशन प्रभारी फजलगंज अनुराग मिश्रा यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.