बहुजननामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोनाचा हैदोस वाढत असून कोरोनावर औषध शोधण्यासाठी विविध देशांकडून पृयत्न केले जात आहेत. जगातले सगळे प्रगत देश त्यावर औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भातले अनेक दावे हे संशोधनाच्या पातळीवरचे आहेत. इटलीच्या संशोधकांनी कोरोनावर ‘लस’शोधल्याचा दावा केलाय. माणसांवर याचे प्रयोग झाले असून त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
रोमच्या संशोधकांनी हा दावा केला असून लसीचा प्रयोग माणसांवर करण्यात आला आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्या अँटीबॉडीज या व्हायरसचा नाश करतात असा दावाही या संशोधकांनी केला आहे. अँटीबॉडीजमुळे व्हायरसला शरीरातल्या पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे त्या माणसाच्या प्रतिकार शक्तीवर हल्ला करू शकत नाहीत.
इस्त्रायल आणि अमेरिकेतल्या संशोधकांनीही कोरोनावर लस शोधण्याच्या कामात प्रगती केल्याचा दावा केला आहे. मात्र हे संशोधन असून सुरवातीच्या टप्प्यांमध्येच असून इटलीच्या संशोधकांनी त्याचा माणसांवर प्रयोग केल्यानंतर यश मिळाल्याचा दावा केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमेरिकेतील फाइजर आणि जर्मनीतील बायोएनटेक कंपन्यांनीही एकत्रितरित्या लस विकसित केल्याचा दावा केला आहे. सोमवारपासून ह्युमन ट्रायल सुरू करण्यात आले आहे. जर हे ट्रायल यशस्वी झाले तर ही लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.