मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भारताचे चांद्रयान-२ मिशन लॉन्च झाल्यानंतर लगेच पाकिस्तानने एक मोठी घोषणा केली. पाकिस्तानने दावा केला आहे की, २०२२ मध्ये पाकिस्तान अवकाशात मानव पाठवणार आहे. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवली. पाकिस्तानच्या इमरान खान सरकारमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरीने घोषणा केली आहे की, २०२२ मध्ये अवकाशात आपला पहिला माणूस जाणार आहे.
फवाद चौधरीने गुरुवारी ट्विटरवर लिहिले की, यासाठी प्रक्रिया सुरु होईल. पहिले पन्नास लोकांना शॉर्टलिस्ट केले जाईल त्यानंतर लिस्ट २५ पेक्षा कमी होईल आणि २०२२ मध्ये आपण अवकाशात आपला पहिला मानव पाठवू. त्यानंतर लोकांनी त्यांचा समाचार घेतला.
विजय मिश्रा नावाच्या एका यूजरने भाज्यांचे एक एयरक्राफ्ट तयार केले आणि पाकिस्तानचे अवकाश मिशन म्हणून वर्णन केले.
@sarbartha नावाच्या यूजरने अशा प्रकारे खिल्ली उडवली.
रोहित अग्रवालने सांगितले की, पाकिस्तानचा प्रवास १९४७ ते २०१९ पर्यंत कसा राहिला.