नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – आधीच संथावलेल्या अर्थव्यवस्थेवर कोरोना विषाणूजन्य साथीच्या आघातामुळे भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीच्या दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत २३.९ टक्क्यांनी घसरल्याचं मागील आठवड्यात जाहीर झालं. त्याच पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेणार आहे. केंद्र सरकार तब्बल २६ कंपन्यांचं खासगीकरण करणार असल्याची बाब माहिती अधिकारातून स्पष्ट झाली असून त्यासंदर्भातील यादी सुद्धा समोर आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २७ जुलै २०२० रोजी केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील २३ कंपन्यांचे खासगीकरण करणार असल्याचे सांगितलं होत. या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदीलही मिळाला होता. मात्र, सरकार नक्की कोणत्या कंपन्यांतील हिस्सेदारी विकणार याबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. पण आता माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या एका उत्तरात सरकार सार्वजनिक क्षेत्रातील २३ नाहीतर २६ कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकणार असल्याचं समोर आलं आहे. सरकारच्या अनेक कंपन्या तोट्यात असून त्यांना हजारो कोटींची मदत केंद्र सरकारला द्यावी लागते. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडतो. तो कमी करण्यासाठी सरकार या २६ कंपन्यांमधील आपला हिस्सा विकणार आहे. कंपनीच्या बाजारमूल्यावर त्यांची किंमत अवलंबून राहणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे.
१. Project & Development India Limited (PDIL)
२. Engineering Projects India Limited (EPIL)
३. Pawan Hans Limited (PHL)
४. B&R Company Limited (B&R)
५. Air India
६. Central Electronics Limited(CEL)
७. Cement Corporation India Limited CCIL (Nayagaon unit)
८. Indian Medicine & Pharmaceuticals Corporation Ltd. (IMPCL)
९. Salem Steel Plant, Bhadrawati Steel Plant, Durgapur Steel plant
१०. Ferro Scrap Nigam Ltd. (FSNL)
११. Nagarnar Steel Plant of NDMC
१२. Bharat Earth Movers Limited (BEML)
१३. HLL Lifecare
१४. Bharat Petroleum Corporation Ltd. (BPCL)
१५. Shipping Corporation of India Ltd. (SCI)
१६. Container Corporation of India Ltd (CONCOR)
१७. Nilachal Ispat Nigam Limited (NINL).
१८. Hindustan Prefab Limited (HPL)
१९. Bharat Pumps and Compressors Ltd (BCPL)
२०. Scooters India Ltd (SIL)
२१. Hindustan Newsprint Ltd (HNL)
२२. Karnataka Antibiotics & Pharmaceuticals Ltd (KAPL)
२३. Bengal Chemicals and Pharmaceuticals Ltd. (BCPL)
२४. Hindustan Antibiotics Ltd. (HAL)
२५. Indian Tourism Development Corporation (ITDC)
२६. Hindustan Fluorocarbon Ltd (HFL)