बहुजननामा ऑनलाईन – माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडियाशी संबंधित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बुधवारी सीबीआयने अटक केली. दरम्यान चिदंबरम यांच्याकडून सीबीआयच्या एफआरआयमध्ये आपले नाव नसल्याचा दावा केला जात होता. तर अटक पूर्वी जमीन नाकारताना चिदंबरम हेच मुख्य सूत्रधार असून, प्रतिष्ठेचा विचार न करता गुन्हेगाराच सत्य मांडा, असे न्यायालयाने जमीन नाकारताना सांगितले आहे.
याप्रकरणी पी. चिदंबरम यांचा दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन नाकारला. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. अखेर बुधवारी रात्री त्यांनी पत्रकार परिषदेतून आपली बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले माझ्या कुटुंबातील सदस्यांसह या प्रकरणात कोणीही आरोपी नाही. तसेच सीबीआय अथवा ईडीच्या एफआयआरमध्येही आमचे नाव नाही. परंतु दिल्ली न्यायालयाने जामीन नाकारताना नोंदवलेले मत आणि चिदंबरम यांच्याकडून करण्यात येणारा दावा यात विसंगत असल्याचे दिसून आले आहे.
मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने चिदंबरम यांचा जमीन नाकारला. यावेळी न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, सीबीआय आणि ईडीने सादर केलेल्या पुराव्यावरून महत्त्वाच्या भ्रष्टाचार प्रकरणात चिदंबरम हे मुख्य सूत्रधार आहेत. तपास यंत्रणांनी सादर केलेल्या नोंदीवरून याचिकाकर्त्याने केलेले गुन्हे हे गंभीर आहे. यामुळे सहआरोपी जामिनीवर असून त्यांच्याशी तुलना करू नये. त्याचबरोबर प्रतिष्ठेचा विचार न करता आरोपी उघडे पाडावे. त्याचबरोबर भ्रष्टाचार करणाऱ्यांना अटकपूर्व जामीन मिळणार नाही, यासाठी संसदेने कायदा अधिक धारदार करावा असे मत न्यायमूर्ती गौर यांनी जामीन नाकारता निकालपत्रात नोंदवले आहे.