Thane Gang Rape | 8 महिन्यापर्यंत प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी केला गँगरेप, 33 जणांवर गुन्हा दाखल, 26 जणांना पोलिसांकडून अटक

thane gang rape girl gang raped multiple times in maharashtra thane 33 booked two minors among 26 held so far

कल्याण : बहुजननामा ऑनलाईन – Thane Gang Rape | राज्यातील साकीनाका बलात्कार (Sakinaka Case) प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडालेली असतानाच आता ठाणे जिल्ह्यात (Thane Gang Rape) 15 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची एक संतापजनक घटना घडली आहे. या मुलीवर अनेकदा सामुहिक बलात्कार करण्यात आला. मागील 8 महिन्यात विविध ठिकाणांवर या मुलीवर अनेकदा सामुहिक बलात्कार करण्यात आला.

24 जणांसह 2 अल्पवयीन ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 24 लोकांना अटक केली (24 people and detained) आहे आणि 2 अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व क्षेत्र) दत्तात्रेय कराळे (Additional Commissioner of Police, East Zone, Dattatreya Karale) यांनी दिली.

33 जणांवर गुन्हा दाखल (Charges filed against 33 persons)

अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व क्षेत्र) दत्तात्रेय कराळे यांनी म्हटले की, पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर डोंबिवलीमध्ये मानपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री 33 आरोपींविरूद्ध आयपीसी कलम 376 (बलात्कार), 376 (एन) (वारंवार बलात्कार), 376 (डी) (सामुहिक बलात्कार), 376 (3) (सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल (Thane Gang Rape) केला आहे.

प्रियकराने व्हिडिओ बनवून केले ब्लॅकमेल

कराळे यांनी पत्रकारांना सांगितले की, हा गुन्हा या वर्षी 29 जानेवारी ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान घडला. हे सर्व तेव्हा सुरू झाले, जेव्हा जानेवारीमध्ये मुलीच्या प्रियकराने तिच्यावर बलात्कार केला आणि घटनेचा व्हिडिओ बनवला.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

मित्र आणि ओळखीच्यांनीही केला बलात्कार

त्याने या व्हिडिओच्या आधारावर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. नंतर त्याच्या मित्रांनी आणि ओळखीच्यांनी तिच्यावर किमान
चार-पाच ठिकाणी म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, बदलापुर, मुरबाड आणि रबाळेसह विविध ठिकाणी सामुहिक बलात्कार केला.

महिला एसीपींच्या नेतृत्वात एसआयटी गठित

कराळे यांनी सांगितले की, प्रकरणाच्या तपासासाठी एसीपी सोनाली ढोले (ACP Sonali Dhole) यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (SIT) गठित केले आहे.

इतर आरोपींचा शोध सुरू

पीडितेने 33 लोकांची ओळख पटवली आहे. त्यांच्यापैकी 24 लोकांना अटक केली आहे आणि दोन अल्पवयीनांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. कराळे म्हणाले की, गुन्ह्यात सहभागी इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

 

web title: Thane gang rape girl gang raped multiple times in maharashtra thane 33 booked two minors among 26 held so far.

 

Overripe Banana side effects | अशाप्रकारची केळीचं सेवन केल्यास फायद्याऐवजी होते मोठे नुकसान, जाणून घ्या

Pune Metro Recruitment 2021 | ‘पुणे मेट्रो’मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; पगार 2.5 लाख रूपयांपर्यंत, जाणून घ्या

Pune Cyber Crime | माय लॅबचे बनावट ‘डोमेन’ बनवून नागरिकांची फसवणूक; पुणे सायबर पोलिसांकडून गुजरातमधील दोघांना अटक

Nashik Accident | दुर्देवी ! सिन्नरजवळील रस्त्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पल्सरवरील दोघा मित्रांचा मृत्यु