ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – Thane Crime News | 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. संपूर्ण राज्य “छत्रपती शिवाजी महाराज की जय” घोषणांनी दुमदुमले होते. मात्र या घोषणा देणे ठाण्यातील कळव्यात राहणाऱ्या काही तरुणांना महागात पडले आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्या म्हणून या तरुणांवर कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल (Thane Crime News) केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे नेमके प्रकरण?
कळव्यातील जयभीम नगर ते कळवा नाकापर्यंत तुळशीराम साळवे, भिमा साळवे या तरुणांनी काही तरुणांसह बाईक रॅली काढली होती. या रॅली दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देखील दिल्या. पण हि रॅली काढणे आणि घोषणा देणे त्यांना महागात पडले आहे. कळवा पोलिसांनी या प्रकरणी तुळशीराम साळवे, भिमा साळवे आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे कळवा पोलिसांवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. (Thane Crime News)
या प्रकरणी नागरिकांनी प्रश्न उपस्थित करताच जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले गेले आणि दरम्यान घोषणा
दिल्या. गेल्या अशा स्वरुपाचा हा गुन्हा दाखल केला गेला.
गुन्हा हा फक्त घोषणा दिल्या म्हणून नाही तर विना परवाना बाईक रॅली काढून सार्वजनिक ठिकाणी घोषणा
दिल्या म्हणून गुन्हा दाखल केला गेला आहे, अशी सारवासारव कळवा पोलिसांकडून करण्यात आली आहे.
Web Title :- Thane Crime News | a case has been registered against the youth for slogan chhatrapati shivaji maharaj ki jai at kalwa thane
हे देखील वाचा :