इस्लामाबाद : वृत्तसंस्था – मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातला (Terrorist attack) मास्टरमाईंड हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) लाहोर येथील घराबाहेर भीषण स्फोट (Explosion) झाला आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावर बॉम्बशोधक पथक(Bomb Squad) आणि पोलीस दाखल झाले असून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. स्फोटामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पण हाफीज सईदच्या (Terrorist Hafiz Saeed) घराजवळ हा स्फोट झाल्याने यामागे मोठं षडयंत्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पाकिस्तानात (Pakistan) एकच खळबळ उडाली आहे. स्फोट झाला त्यावेळी हाफीज सईद घरीच होता का, याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका भयंकर होता की, परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. तर एक इमारत पूर्णपणे कोसळली आहे. प्राप्त माहितीनुसार, जौहर टाउनच्या अकबर चौकातील एका राहत्या घरात हा स्फोट झाला आहे. एका वृत्तानुसार हाफीज सईद ज्या परिसरात राहत होता, तिथून जवळच हा स्फोट झाला आहे. या घरात संशायस्पद स्थितीत अनेकांची ये-जा होती. पाकिस्तानी चॅनल ARY न्यूजच्या माहितीनुसार, स्फोटोत चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना ICU मध्ये दाखल केले आहे. तर 2-3 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस (Police) दाखल झाले असून पंचनामा करत आहेत.
Web Title :- Terrorist Hafiz Saeed | massive blast near hafiz saeeds house at lahor pakistan 2 killed
ED | विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर
Thackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे छगन भुजबळ संतापले, म्हणाले…
Iqbal Kaskar | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबईत अटक; ‘या’ प्रकरणात आवळल्या मुसक्या